Khed : समर्थ नगरमध्ये घरफोडीत दहा हजारांची चोरी

खेड : खेड येथील समर्थ नगरमधील दिवेकर चाळीत २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे अंदाजे ३:३० वाजता घरफोडीची एक गंभीर घटना घडली आहे. साक्षी सचिन जाधव यांच्या भाड्याच्या खोलीला लक्ष्य करत, एका अज्ञात चोरट्याने प्रवेश मिळवला. चोरट्याने घराच्या दर्शनी रूमच्या स्लाइडिंग खिडकीला बाहेरून असलेल्या लोखंडी सेफ्टी ग्रीलचे खिळे कोणत्यातरी हत्याराने उचकून काढून त्यातून आत प्रवेश केला.

खोलीत प्रवेश केल्यावर चोरट्याने साक्षी जाधव यांच्या दुसऱ्या खोलीमध्ये ठेवलेले लोखंडी कपाट उघडले. कपाटातील चॉकलेटी पर्समध्ये ठेवलेली ₹१०,००० (दहा हजार) रोख रक्कम घेऊन तो पसार झाला. पळताना त्याने खोलीच्या दर्शनी बाजूने बंद केलेली कडी उघडून धूम ठोकली.

सदर चोरीची घटना लक्षात येताच, साक्षी जाधव यांनी तत्काळ २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:१८ वाजता खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 27/Nov/2025