Olive Ridley Turtle : ऑलिव्ह रिडले कासव हंगामाची मुहूर्तमेढ गुहागरात

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धन हंगामाची सुरुवात होत आहे. या वर्षातील ऑलिव्ह रिडले कासवाचे पहिले घरटे गुहागर किनाऱ्यावर आढळून आले आहे. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, गुहागर परिसरात हॅचरी क्रमांक ३ मध्ये घरटे क्रमांक १ म्हणून या अंडींची नोंद करण्यात आली. तब्बल १२८ अंडी संरक्षित करण्यात आली. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी समुद्रातून बाहेर येऊन कासवाने घरटे खोदल्याचे आढळताच कांदळवन विभाग, स्थानिक कासव मित्र यांनी तत्काळ पावले उचलली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा क्षण महत्त्वाचा असल्याचे मत अधिकारी व्यक्त करत आहेत.

ऑलिव्ह रिडले हे जागतिक स्तरावर संकटग्रस्त प्रजातीच्या यादीत समाविष्ट आहे. कोकण किनारपट्टी त्यांच्या नैसर्गिक प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. येणाऱ्या काही दिवसांत अधिक कासवे किनाऱ्यावर अंडी देण्यासाठी येण्याची शक्यता आहे. जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करावे, असा संदेश कांदळवन विभागाने दिला आहे.

दरवर्षी कासव संवर्धन मोहिमेला बळकटी मिळवत आहे. कासव मित्र आणि कांदळवन विभाग यासाठी कायम जागरूक आहे- किरण ठाकूर, रत्नागिरी परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 28/Nov/2025