रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी खेड येथून अज्ञात तरुणाला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा तरुण बेशुद्ध असल्यामुळे त्याचे नाव-गाव आणि त्याच्या नातेवाईकांशा शोध घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वा. हा अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष असलेला तरुण बेशुध्द अवस्थेत सापडला. खेड कळंबनी प्राथमिक आरोग्य -केंद्रातून अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री १० वा. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या उजव्या व डाव्या दोन्ही हातांवर टॅटू आहेत. उजव्या हातात तांब्याचे कडे तसेच मानेवरही टॅटू आहे. या तरुणाबाबत कोणालाही काहीही माहिती मिळून आल्यास किंवा कोण ओळखत असल्यास त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलिस ठाणे किंवा जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 28/Nov/2025














