Ratnagiri: समाजकल्याण विभागामार्फत आजपासून जिल्हास्तरीय क्रीडा व कला सांस्कृतिक महोत्सव

रत्नागिरी : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण द्वारा मुलां/मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी आणि समाजकल्याण कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व कला/सांस्कृतिक महोत्सव 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राजापूर तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजापूर तालुक्यातील मुलांचे शासकीय वसतिगृह, रायपाटण (पाचल) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजता होणार असून समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता होणार असून, समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे व जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. पारितोषिक वितरण समारंभ 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाजकल्याण आयुक्तालय सहआयुक्त (शिक्षण) प्रमोद जाधव यांच्या हस्ते होणार असून समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 28-11-2025