रत्नागिरी : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारा दिनांक १७ डिसेंबर रोजी दु. २.३० वाजता दुसरा मजला, जी. पी. ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये १३३ वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डिंग, जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई ४००००१ यांचे नावे दोन प्रतिसह दिनांक ०१ डिसेंबर २०२५ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 28/Nov/2025














