साठरे बांबर येथे हातभट्टीची दारु विक्री प्रकरणात महिलेविरुद्धात गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील साठरे बांबर-बौध्दवाडी येथील एका जुन्या घराजवळ गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ वा. सुमारास करण्यात आली. शारदा सुभाष पवार (५७, रा. साठरे बांबर बौध्दवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात महिला पोलिस हवालदार तृप्ती सावंतदेसाई यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी संशयित ही विना परवाना आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची ८०० रुपयांची ८ लिटर दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 28/Nov/2025