देवरूख नगर पंचायत निवडणुकीसाठी ‘मनसे’ची आज प्रचारफेरी

रत्नागिरी : देूरुख नगर पंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी, दि. २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव देवरूखमध्ये येणार असून शहरातून रिक्षा आणि दुचाकी फेरी निघणार आहे.

यावेळी मनसे संपर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे, जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, शहराध्यक्ष सागर संसारे, मनविसे शहराध्यक्ष ऋतुराज देवरूखकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 28-11-2025