Voter Awareness Program | चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीला प्रारंभ

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका २ डिसेंबर रोजी होत असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर नगरपरिषद क्षेत्रात मतदान जनजागृतीचा शुभारंभ प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर करण्यात आला.

यावेळी उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक कलाकारांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करीत नागरिकांना २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 28/Nov/2025