चिपळूण : शहरातील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर मंगळवारपासून चिंचघरी गणेशवाडी येथे सुरु झाले असून, ते १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या निवासी शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्याहस्ते झाले. यावेळी न. ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. स्नेहल कुलकर्णी, चिंचघरी गावच्या सरपंच अनिता गुरव, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव उपस्थिती होते.
या शिबिरांतर्गत डॉ. प्रतीक ओक यांचे एआयची ओळख, प्रा. विनायक बांद्रे यांचे ‘सूत्रसंचालन कसे करावे’, प्रा. चेतन खांडेकर यांचे ‘आधुनिक काळातील आर्थिक व्यवहाराची ओळख’ या विषयांवर व्याख्यान झाले. २८ रोजी दुपारी ३ वा. मनोज गांधी यांचे ‘शाश्वत शेती व आरोग्य’, तर सायंकाळी ७ वा. प्रा. हरिश बान यांचे ‘सर्प विश्व’, २९ रोजी दुपारी ३० प्रा. अमित शेवडे यांचे ‘सायबर लॉ ३० रोजी दुपारी ३ वा. ‘पर्यावरण संरक्षण काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री ९ वा. विद्याथ्यर्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम, १ डिसेंबर रोजी सकाळी एड्स जनजागृती फेरी व शिबिराचा सांगता समारंभ होणार आहे.
शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर, सल्लागार प्रा. विनायक बांद्रे, प्रा. अरुण जाधव, प्रा. स्वप्निल साडविलकर, सहकार्य क्रमाधिकारी प्रा. प्रदीप वळवी, प्रा. विठ्ठल कोकणी, समिती सदस्य प्रा. कोंडीराम सावरे, प्रा. मदन निपाणे, प्रा. तृप्ती यादव, प्रा. प्रेमकुमार शिवगण, प्रा. दिशा दाभोळकर, प्रा. सोनाली खर्चे, विद्यार्थी प्रतिनिधी दानिश कारेकर, समर्थ रजपूत, दुर्वा मते, माधुरी साळवी आदी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 28/Nov/2025














