Khed : काडवली येथील स्टोन क्रशरवर ३ लाखांचा मुद्देमाल लंपास

खेड : तालुक्यातील मौजे काडवली येथील स्टोन क्रशरवर झालेल्या मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ ते १८ नोव्हेंबर सकाळी ९.३० वाजेदरम्यान ही चोरी घडली असून तब्बल २ लाख ८६, हजार रुपये किमतीचा विविध प्रकारचा मुद्देमाल चोरून नेला आहे. खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टोन क्रशरवर काम करणारा शाहरूख (पूर्ण नाव व गाव माहिती नाही) याच्यावर चोरीचा संशय असून, पोलिसांत तक्रार देणाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने लबाडीच्या हेतूने परवानगीशिवाय विविध साहित्य चोरून नेले.

त्यामध्ये ओरियंट कंपनीचे २ चॉकलेटी रंगाचे सिलींग फॅन, जुने सुमारे ४ हजाराचे सामान, २ पांढऱ्या रंगाचे लाईटचे एमसीबी ३ हजार रुपये, पॉलीकॅव कंपनीच्या १.५ एमएम जाडीच्या इलेक्ट्रीक वायरची १६ बंडल ३२ हजार रुपये, पिवळ्या रंगाची ग्राइंडर मशीन ५ हजार, पिवळ्या रंगाचे २ स्पॅनर बॉक्स सेट १२ हजार रुपये, क्रशर कन्वेअर बेल्टसाठी १६ बेअरिंग ८० हजार रुपये, पोकलेन मशीनच्या इंजिनमधील हायड्रोलीक पंप १ लाख ५० हजार रुपये आदी साहित्य चोरीस गेले आहे. खेड पोलिसांनी पंचनामा केला आहे. आरोपी शाहरूखचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून तपासणी सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 28/Nov/2025