खेडमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

खेड : खेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाचा बुधवारी (ता. २६) सायंकाळी मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्यामुळे हा अपघात की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. निलांबर उर्फ बबलू चौगुले असे त्या तरुणाचे नाव आहे. निलांबर चौगुले हा व्यवसायाने डंपर चालक असून, काही व्यक्तींशी झालेल्या वादातूनच हा मृत्यू ओढवला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 28/Nov/2025