Ratnagiri : भैरी-तळेकरीण मंदिरात नवचंडी यज्ञ

रत्नागिरी : करजुवेची ग्रामदेवता श्री देव भैरी, श्री दुर्गादेवी तळेकरीण माता पुरातन मंदिरात गोंधळ व नवचंडिका यज्ञ समारंभ भाविकांच्या उत्साहात साजरा झाला. प्रतिवर्षाप्रमाणे देवीचा गोंधळ व गावच्या सुखसमृद्धीसाठी दर तीन वर्षांनी नवचंडिका यज्ञाचे आयोजन केले जाते. अमावास्येच्या दिवशी देवीची रूपे लागली, गावच्या पुजाऱ्यांनी देवीची विधिवत पूजा केली.

देवदीपावलीनिमित्त विधिवत पूजा करून त्याच दिवशी गावचे मानकरी, खुमदार व गावकरी यांना मानाचा दिवा देण्यात आला. त्यानंतर दोन दिवस देवीचा गोंधळ संध्याकाळी घालण्यात आला व शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर नवचंडिका यज्ञ, गावातील मंडळींची भजने, आरती व महिलांचे पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम रंगले. दुसऱ्या दिवशी नवचंडी यज्ञाची समाप्ती झाली. या कार्यक्रमाला माहेरवाशिणी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 28/Nov/2025