Ratnagiri : कळझोंडी पंचशील नगरात स्वच्छता मोहीम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती पंचशील नगर येथील तिसंग बौद्धवाडी ते सुंदरवाडी घरकुल वसाहत सुमारे १ कि.मी. पायवाट सरपंच दीप्ती वीर व उपसरपंच प्रकाश पवार यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आली.

याकामी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी पवार, सभापती प्रकाश भा. पवार, संदीप गो. पवार, महिला मंडळाच्या अध्यक्षा नलिनी पवार, उपाध्यक्ष संपदा पवार, सेक्रेटरी रिना पवार, करुणा पवार, सभापती नम्रता पवार, सल्लागार मयुरी पवार, कलावती पवार, नंदिनी पवार, कल्पना पवार यांनी ग्रामस्थांच्या सहाकार्यान स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी केली. तिसंग बौद्धवाडी बुद्ध विहार मार्गे सुंदरवाडी ही पाऊल वाट आजूबाजूला असलेल्या जुन्या झाडीझुडपे, जंगली फांद्या, गवत कापून साफसफाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 28/Nov/2025