रत्नागिरी : राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या उपचारांच्या यादीत ‘ओरल अॅड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ (मुख शल्यचिकित्साशास्त्र) या विशेष शाखेचा समावेश केला आहे. याअंतर्गत २२ नवीन दंत व मुख शस्त्रक्रियेसह मुख कर्करोग संदर्भातील उपचार समाविष्ट केले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचा आता खासगी रुग्णालयात करावा लागणारा खर्च वाचणार आहे.
जनआरोग्य योजनेत आता मौखिक शस्त्रक्रिया (oral surgery) समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे दातांच्या समस्या आणि मौखिक आरोग्याच्या उपचारांसाठी शस्त्रक्रियांचा समावेश मोफत उपचारांमध्ये करण्यात आला आहे. आता लाभार्थी योजनेंतर्गत पात्र असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेऊ शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या उपचारांच्या यादीत ‘ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ (मुख शल्यचिकित्साशास्त्र) या विशेष या नवीन उपक्रमांतर्गत २२ नवीन दंत व मुख शस्त्रक्रिया आणि मुख कर्करोगाशी संबंधित ४ उपचारांचा समावेश असून, पात्र लाभार्थ्यांसाठी ते मोफत असतील.
‘मुख शल्यचिकित्साशास्त्र’ शाखेचा समावेश
जनआरोग्य योजनेच्या उपचारांच्या यादीत ‘ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ (मुख शल्यचिकित्साशास्त्र) या विशेष शाखेचा समावेश केला आहे.
दातांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येणार
नव्या सुधारणांनुसार या योजनेंतर्गत२२ नवीन दंत व मुख शस्त्रक्रियेसह मुख कर्करोग या आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या किंवा निश्चित केलेल्या खासगी रूग्णालयांमध्ये हे उपचार मोफत मिळणार आहेत.
गोरगरीब रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
दातांसंबंधी उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कसा घ्यायचा लाभ?
लाभ घेण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जनआरोग्य योजना या स्वतंत्र विभागाकडे माहिती मिळू शकते. किंवा या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांकडे नोंदणी करता येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 PM 29/Nov/2025














