माखजन : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकाला सध्या झळाळी आली आहे माखजन ग्रामस्थांच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून माखजन एस टी बस स्थानकाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. व श्रमदानातून कुंड्यात झाडे लावण्यात आली आहे.
लोकसहभागातून परीसर स्वछ झाल्याने, बसस्थानकाची शोभा वाढली आहे. यासाठी सरपंच महेश बाष्टे, सतीश साठे, विशाल रांजणे, लियाकत माखजनकर, एस टी कंट्रोलर श्री चव्हाण व त्याचे कर्मचारी यांचे पण मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळेच माखजन एस टी बस स्थानकाने सलग दुसऱ्या फेरीत पण तीन नंबर राखला आहे एक गुणांने दोन नंबर गेला आहे. माखजन सरपंच महेश बाष्टे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 28/Nov/2025














