रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपरिषद क्षेत्रात आणि देवरूख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्याचे उपसचिव हेमंत महाजन यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना आणि केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सूचित करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 29/Nov/2025














