Ratnagiri: जिल्ह्यात प्रथमच मोफत डेमो पोलिस भरती

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलिस भरतीचे आयोजन केले आहे.

देवरूख येथे ए. एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानात ३० नोव्हेंबरला सकाळी ६ वा. ही डेमो भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. आतापर्यंत या भरतीसाठी १२०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेल्या १५ हजारांपेक्षा जास्त जागांच्या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर या भरतीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष भरतीपूर्वी स्वतःचे मूल्यमापन करता यावे. त्यानंतर त्यात सुधारणा करता याव्यात जेणेकरून या भरतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती पोलिस प्रशासनात रुजू होतील. या उद्देशानेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी या डेमो भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. जिजाऊ संस्थेच्या अनिवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जाते. या भरतीत पहिल्या ७० विद्यार्थ्यांना या निवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश दिले जाणार आहेत. याशिवाय सध्या जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी, लांजा, सापुचेतळे, देवरूख, गुहागर, जाकादेवी या ठिकाणी कार्यरत आहेत. जिजाऊ संस्था जिल्ह्यातील १२वी पास असलेल्या १८ ते २८ वयोगटातील युवक युवतींना या भरतीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क केदार चव्हाण, ॲड. महेंद्र मांडवकर यांच्याशी साधावा.

रत्नागिरीत निवासी प्रशिक्षण केंद्र
जिजाऊ संस्थेचे मोफत चालवले जाणारे निवासी प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथे सुरू आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात १०० विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस सांबरे यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 29-11-2025