रत्नागिरी : साखरपा (ता. संगमेश्वर) येथील मुर्शी वाणीवाडी रस्त्यावर दुचाकी घसरली. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा असे तिघेजण किरकोळ जखमी झाले. उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची ही घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. सुमारास मुर्शी-वाणीवाडी रस्त्यावर घडली.
दुचाकी चालक संतोष धोंडू फोंडे (वय ३४, रा. साखरपा, संगमेश्वर) हे दुचाकी घेऊन दख्खन ते साखरपा असे येत असताना मुर्शी-वाणीवाडी रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली. या अपघातमध्ये संतोष फोंडे व त्यांची पत्नी ही किरकोळ जखमी झाले. मात्र सोबत असलेला त्यांचा लहान मुलगा-देवांश याच्या डोक्याला मार लागला. तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 29/Nov/2025














