Ratnagiri : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आली. सुरेश बाबू ठोंबरे (६४, रा. कोतवडे सनगरेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार मनोज पावसकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा कोतवडे येथील सनगरे स्टॉप येथील रस्त्याच्या कडेला आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 29/Nov/2025