चिपळूण : दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोट हा भारतातील काही उच्चशिक्षित डॉक्टरांनी केला आहे. यात अल-फलाह या विद्यापीठाचा वापर कटाच्या बैठका, स्फोटके साठवण्यासाठी केला गेला. या विद्यापीठातील १५ डॉक्टर या घटनेनंतर फरार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सर्वत्रच अस्थिर व भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिपळूण येथे ही इमारती बांधकामे, भंगार, लोटे व खडपोली औद्योगिक क्षेत्रात कॉन्ट्रॅक्टरच्या नावाखाली अनेक घुसखोर येथे आल्याचे संशय निर्माण झाला आहे.
यामुळे चिपळूण परिसरातही कोम्बिंग ऑपरेशन राबवून घुसखोरांचा शोध घ्यावा, या बाबतचे निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे माध्यमातून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांना देण्यात आले.
यावेळी अधिकारी बेले यांनी, काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनाही हे निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, सहसंयोजक प्रशांत उतेकर, गोरक्षक विक्रम जोशी, संदीप खरे, हेमंत चाळके, मधुकर शिंदे, दीपक पवार, शशिकांत मोरे, सकल हिंदू समाजाच्या वतीने राजेश ओतारी, सचिन तांबट आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 29/Nov/2025














