रत्नागिरी : पावस प्राथमिक आरोग्य केंद्र व गोळप उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वायंगणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे व डॉ. अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन कुष्ठरोगाबाबत जागृतीपर संदेश दिले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, निदान व उपचारपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच टीबी मुक्त भारत अभियान, जलजन्य आजार, किटकजन्य आजारांपासून बचाव, याविषयी आरोग्य शिक्षणही देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 29/Nov/2025














