Ratnagiri : चाफे मयेकर महाविद्यालयाचे निवासी शिबिर संपन्न

जाकादेवी : चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार, श्रमदान निवासी शिबिर जयगड-नांदिवडे येथील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडले.

यावेळी संस्थेचे खजिनदार सुरेंद्र माचिवले, प्राचार्या स्नेहा पालये, जयगड माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूलचे सहायक शिक्षक निवास पाटील, सहायक शिक्षक कुणाल तडवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुयोग मोहिरे, सहायक प्रा. तेजश्री रेवाळे उपस्थित होते.

या शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी नांदिवडेतील २ किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता केली. तसेच जयगड किल्ल्यातील प्लास्टिक कचरा, गवत व किल्ल्यासभोवताली वाढलेली झाडी तोडून साफसफाई केली. कराटेश्वर मंदिर परिसर व भक्त निवास परिसर तसेच माध्यमिक विद्यामंदिर जयगड व जयगड जेटी परिसर स्वच्छ करण्यात आला.

तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी कृषी क्षेत्रातील वाढत्या व्यवसाय संधी, मंडल कृषी अधिकारी विकास मेढे यांनी सेंद्रिय शेती याविषयी माहिती दिली. समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी यांनी आरोग्यम् धनसंपदा, अरुण मौर्य यांनी कृषी समाज व साहित्यचा त्रिवेणी संगम, तर विष्णू सागवेकर यांनी रांगोळी, सुशील चव्हाण यांनी इतिहासाविषयी माहिती दिली. त्यानंतर नंदकिशोर रसाळ यांनी माझे विद्यार्थी पथनाट्य या विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरार्थीनी मतदान, जनजागृती, व्यसनमुक्ती, राजकारण या विषयावर पथनाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या शिबिराला प्रा. जितेंद्र बोंबले, प्रा. वर्षा सनगरे, प्रा. हरेश गावडे, प्रा. केतकी धुमक, प्रा. मैथिली भरणकर यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 29/Nov/2025