रत्नागिरी : जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त एड्सविषयी जनजागृती करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करण्यासाठी येत्या सोमवारी, १ डिसेंबर रोजी रत्नागिरीत दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजता फेरी सुरू होईल. ही फेरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथून सुरू होऊन जयस्तंभ मार्गे एसटी बसस्थानकाजवळ वळसा घेऊनन साळवी स्टॉप मार्गे पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे येऊन समाप्त करण्यात येणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा एड्स नियंत्रण समितीचे सदस्य सचिव भास्कर जगताप यांनी ही माहिती दिली असून फेरीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 29-11-2025














