रत्नागिरीत ‘नगर राजभाषा कार्यान्वयन’ समितीची बैठक उत्साहात संपन्न

रत्नागिरी : नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची सहामाही बैठक नुकतीच न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. च्या संमेलन कक्षात झाली. समितीद्वारे सहामाही हिंदी पत्रिका राजभाषा रत्नसिंधूचे प्रकाशन करण्यात आले.

सभेला गृहमंत्रालय राजभाषा विभागाकडून सहाय्यक निदेशक प्रमोद सांगोळे, बँक ऑफ इंडिया, प्रधान कार्यालयातून सहाय्यक महाप्रबंधक मऊ मैत्रा उपस्थित होते. शहरातील केंद्र सरकारी कार्यालयामध्ये राजभाषा हिंदीचा प्रचार प्रसार करण्यासाठी गृहमंत्रालय, राजभाषा विभागाने नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची स्थापना केली आहे. समितीच्या आयोजनाचे कार्य बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालयास दिले आहे. अध्यक्षस्थानावरून नरेंद्र देवरे यांनी सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अंतर्गत कामकाजामध्ये हिंदीचा अधिक वापर करावा असे सांगितले. बैठकीचे नियोजन रत्नसिंधुचे सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी केले. या वेळी पुरस्कार वितरण करण्यात आले. या प्रसंगी आशुतोष शिवपुरे, टी. एन. उपाध्याय, शैलेश बापट उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 29/Nov/2025