Khed : शेल्डी येथे बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

खेड : तालुक्यातील शेल्डी खालची वाडी येथे संतोष राजाराम आंब्रे (वय ५२) यांच्या घरात दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० ते २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने आंब्रे यांच्या घराच्या दर्शनी दरवाज्याचे पितळी कुलूप हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजाही हत्याराच्या मदतीने तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

चोरीस गेलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
सोन्याचे दागिनेः
२० ग्रॅमचे जुने वापरते सोन्याचे ब्रेसलेट (किंमत ₹ १,६०,०००)
२५ ग्रॅमचा जुना वापरता सोन्याचा हार (किंमत ₹ २,००,०००)
१२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत ₹ ५,४००)
६ ग्रॅमची सोन्याची जेंट्स अंगठी (किंमत ₹ २,७००)
४ ग्रॅमची लेडीज अंगठी (किंमत ₹ १,८००)
५ ग्रॅम सोन्याची नथ (किंमत ₹ ५००)
३ ग्रॅम सोन्याची नथ (किंमत ₹ ५००)
रोख रक्कमः १ ६०,०००

एकूण सुमारे १ ४,३०,९०० किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेची तक्रार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४.१६ वाजता खेड पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 29/Nov/2025