पाचल : तळवडे निर्मल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ‘एक दिवस बंधाऱ्यांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत लोकसहभागातून संपूर्ण गावात एकूण १३ बंधारे बांधले. पाणीटंचाईवर मात करणे व जमिनीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी एक दिवस बंधाऱ्यासाठी या अभिनव उपक्रमांतर्गत लोकसहभागातून कच्चे बंधारे, वनराई व विजय बंधारे बांधण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले होते. यानुसार हे बंधारे बांधण्यात आले.
यावेळी सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश जाधव यांच्यासह शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर्स, बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका, इतर सर्व शासकीय कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 01/Dec/2025














