रत्नागिरी : जिल्हा विधिसेवा प्राधिकरणातर्फे दि. १३ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स, दिवाणी बाद, वाद दाखलपूर्व प्रकरणांतर्गत महावितरण कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:16 PM 01/Dec/2025














