General Election 2025 | रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

रत्नागिरी : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून, उद्या (२ डिसेंबर) सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे.

रत्नागिरी नगरपालिकेमध्ये एकूण ६९ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांकरिता ३४५ कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, त्याचबरोबर इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या ६९ मतदान केंद्रात ६४,५४६ मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३१ हजार ३२४ पुरुष मतदार, ३३ हजार ४२१ महिला मतदारांचा, १ इतर मतदारांचा समावेश आहे. आज नगरपालिका परिसरात ईव्हीएम व मतदानाचे साहित्य वितरण करण्यात आले. हे साहित्य घेतल्यानंतर केंद्राधिकाध्यक्ष व मतदान अधिकारी तपासणी करतील व नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर हे साहित्य पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 01/Dec/2025