Ladki Bahin Yojana : नोव्हेंबर महिना संपला! लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार तरी कधी? संभाव्य तारीख आली समोर…

Ladki Bahin Yojana : नोव्हेंबर महिना संपला तरी अद्याप नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे या महिन्याच्या हप्त्याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत.

केवायसी अनिवार्य करणअयात आळ्याने आपले नाव यादीतून कट झाले की काय? असा प्रश्नही अनेक महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. आता याच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर योजनेचे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत असून हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येत आहे.

नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहेत. या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झालेली असल्याने लाडक्या बहिणींना सध्यातरी पैसे मिळण्याची शक्यता नाहीये. पण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर म्हणजेच 4 डिसेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

e-KYC कधीपर्यंत करता येईल?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ई-केवायसी ची सुविधा 18 सप्टेंबरपासून दोन महिन्याच्या कालावधी करिता उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, नंतर ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. ई-केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रकिया यशस्वी पूर्ण केली आहे. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 01/Dec/2025