Ratnagiri : गावखडी खाडीत बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला

पावस : रविवारी दुपारी मच्छीमारी बोटीतून मच्छी आणण्याकरिता जात असताना ती गावखडी खाडीत बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह रविवारी सकाळी हाती लागला. असलम युनूस पेजे (वय ५६) असे बुडून मृत्यू ओढवलेल्या मासेमाराचे नाव आहे.

३० नोव्हेंबर रोजी दुपारी पेजे यांनी गावडे आंबेरे येथे एका मच्छीमाराकडे फोन करून तुझ्याकडे मच्छी उपलब्ध आहे का, अशी विचारणा केले असता त्याने आहे म्हणून सांगितल्यानंतर पेजे हे दुपारी आपली बोट घेऊन गावडे आंबेरेच्या दिशेने निघाले असता त्यांची बोट बुडाली होती.

या घटनेनंतर त्यांचा शोध सुरु असतानाचा अखेर १ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान बिरजेवाडी परिसरामध्ये मृतदेह आढळला. त्यानंतर त्याला किनाऱ्यावर आणू रत्नागिरी शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले. सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारकरिता गावखडी येथे नेण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 02/Dec/2025