मोठी बातमी: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबरला!

मुंबई/नागपूर – राज्यभरात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
आज (मंगळवार) संपूर्ण राज्यात या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, उद्या म्हणजेच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता मतमोजणीसाठी मतदारांना आणि उमेदवारांना आणखी १८ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे राज्यातील निवडणुकीच्या निकालांची तारीख आता थेट २१ डिसेंबर असेल.