दापोली : दापोली तालुक्यातील सडवे गावात चोरट्यांच्या सत्राने पुन्हा डोके वर काढले आहे. जागरूक देवस्थान श्री खेम मंदिर व प्राचीन लक्ष्मी नारायण मंदिरात २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धार्मिक वस्तूंवर डल्ला मारत चोरी केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
चोरट्यांनी साहित्य ठेवण्याच्या खोलीचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. या धाडीत प्राचीन काळातील घंटा, तब्बल ३.५ फूट उंचीची समई, जवळपास २० जोड्या टाळ तसेच इतर मौल्यवान साहित्य लंपास केले आहे. घटनेची माहिती मिळताच मंदिर समितीच्या सदस्यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांकडून चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 02/Dec/2025














