लांजा : मंगळवारी होत असलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा शहर व परिसरात २१० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी लांजा नगरपंचायत हद्द, परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक यंत्रणेसह पोलीस खातेही कमालीचे सक्रिय झाले आहे.
लांजा नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी दोन पोलीस उपविभागीय अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, नऊ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यासह ८४ पोलीस कर्मचारी, ११३ होमगार्ड असे एकूण २१० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
लांजासह देवरूख, राजापूर, नाटे, व पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथील पोलीस कर्मचारी लांजात दाखल झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चेकपोस्टवर थांबून वाहनांची तपासणी केली जात होती. यासह वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी लांजा पोलिसांकडून घेतली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 02/Dec/2025














