देवरुख : देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. १० हजार ७८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला आहे.
नगराध्यक्षासाठी ५, नगरसेवक पदासाठी ६५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी १७ मतदान केंद्रे सज्ज आहेत. यासाठी शाळा महाविद्यालयांच्या मिळून ११ इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. व मतदान शांततेने होण्यासाठी ५० होमगार्ड, ५० पोलीस कर्मचारी, ५ पोलीस अधिकारी व एस आर पी एफ ची २० कर्मचाऱ्यांची तुकडी तैनात केली आहे. हा संपूर्ण बंदोबस्त पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात केला आहे. या फौज फाट्याचे रूट मार्च देवरुख शहरातून रविवारी करण्यात आले.
मतदानाचा हक्क ५ हजार ५८१ महिला व ५ हजार २०८ पुरुष बजावणार सायंकाळी आहेत. सोमवारी प्राचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदान शांततेत पार पाडवे, असे आवाहन तहसीलदार अमृता साबळे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 02/Dec/2025














