Ratnagiri : लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातर्फे पूर्णगडात स्वच्छता अभियान

पावस : श्रमिक किसान सेवा समिती संचलित शिवार आंबेरे लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित दत्तक गाव पूर्णगड येथे दत्त जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये उपेंद्र हरचकर, आशिष हरचकर यांच्यासह सर्व महिला व ग्रामस्थांनी मिळून दत्तवाडी ते नवानगर स्वच्छता केली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. कल्पना मेस्त्री, प्रा. अमित पवार, प्रा. नितीन वळवी, प्रा. अमोल गिरकर, गोवर्धन मोहिते, सुहासिनी धानबा यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या स्वच्छता अभियानानिमित्त प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 02/Dec/2025