HSRP Number Plate Deadline : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढवली; शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

मुंबई : राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. २०१९ च्या सर्व वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. २०१९ आधीच्या सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख काय?

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. आता तुमच्याकडे एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एक महिना उरला आहे. पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील लाखो वाहनधारकांना अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवायची आहे. पुण्यातील १५ लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

२०१९ पूर्वीच्या वाहनांना HSRP बंधनकारक
एचएसआरपी नंबरप्लेट देशातील सर्व वाहनांसाठी सारखी असणार आहे. ही नंबरप्लेट लावणे गरजेचे आहे कारण जर कोणता गुन्हा किंवा अपघात झाला तर वाहनांबाबत लगेच माहिती मिळावी. त्यामुळे आता सर्व वाहनांना एकसारखी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे.

३१ डिसेंबरनंतर भरावा लागणार दंड

परिवहन विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पुण्यातील अजून ६५ टक्के वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. आता या नंबरप्लेटशिवाय आरटीओमध्ये कोणतेही काम होत नाही. दरम्यान, जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांना १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 02/Dec/2025