देवरुख : श्री नारायण स्वामी महाराज यांनी भडकंबा (ता. संगमेश्वर) येथे स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान श्री दत्त जयंती उत्सवाचा शतक महोत्सवी समारंभ ५ रोजी होणार आहे. सध्या गुरुचरित्र पारायण सुरू आहे. दि. ५ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ वा. श्रींची षोडशोपचार पूजा, रात्री ८ वा. आरती, मंत्रपुष्प व छबिना आणि रात्री १० वा. डोंबिवलीचे कीर्तनकार ह. भ. प. संतोष पित्रे यांचे कीर्तन होणार असून तबला साथ स्वरूप जोगळेकर, आणि संवादिनी साथ आकाश लेले देणार आहेत.
३ रोजी गणपती अथर्वशीर्ष सहस्त्र आवर्तने व सत्यविनायक महापूजा आणि महाप्रसाद दु. १ ते ३ या * वेळेत होणार आहे. ४ रोजी दत्तयाग व महाप्रसाद दु. १ ते ३ यावेळेत, तर हळदी-कुंकू समारंभ दु. ३ वाजता रात्री दत्त जन्मोत्सव सोहळा १० वाजाता होणार आहे. ५ रोजी दुपारी १ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद, रात्री ‘कोकणचा साज… संगमेश्वरी बाज’ या कार्यक्रमाने दत्त जयंती उत्सवाच्या शतक महोत्सवी समारंभाचे समापन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 02/Dec/2025














