Devrukh Election | देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी ७४.३३ टक्के मतदान

संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेमध्ये मतदान पार पडले. सायंकाळपर्यंत ७४.३३ टक्के मतदान झाले आहे. त्यात १० हजार ७८९ एकूण मतदारांपैकी ८ हजार २० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नगरपंचायत देवरूख निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरुवात सुरळीतपणे मतदान सुरू झाले. सर्व १७ प्रभागांत दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. सकाळच्या सत्रात मतदानासाठी लोकांची गर्दी कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढलेले होती. महायुती विरुध्द महाविकास आघाडी, अशी लढत याठिकाणी निश्चित झालेली आहे. देवरूखमध्ये एकूण मतदान १० हजार ९८९ असून, त्यापैकी ८ हजार २० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ७४.३३ टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाला येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. हा ओघ कायम राहून सायंकाळी मतदान संपल्यानंतर विक्रमी मतदान झाले आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली असून, देवरूखवासीयांचा कल कोणाकडे राहणार, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 03/Dec/2025