चिपळूण : तालुक्यातील बोरगाव वेलेवाडी येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने गळफासाने आत्महत्या रविवारी घडली. ओमकार मंगेश हुमणे असे या तरुणाचे नाव आहे.
ओमकार हा गुहागर तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या घराच्या शेजारी असणाऱ्या बंद घरातील पडवीमध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो अत्यवस्थ झाला व रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती तत्काळ चिपळूण पोलिसांना देण्यात आली. या नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे घटनास्थळी दाखल झाले.
सायंकाळी उशिरापर्यंत जाव जवाब नोंदवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, ओमकारचा मृतदेह विच्छेदनासाठी चिपळूण कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. अत्यंत गुणी, हुशार मुलगा म्हणून ओमकार याची ओळख होती. बैलगाडी शर्यत, पालखी नृत्य स्पर्धा यामध्ये त्याला विशेष आवड होती. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूने बोरगाव परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 03/Dec/2025














