रत्नागिरी खबरदार’चा डंका! १० हजारांहून अधिक नागरिकांनी अनुभवले नगरपालिकेच्या मतदानाचे ‘लाइव्ह महा कव्हरेज’

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली. या निवडणुकीचा संपूर्ण थरार, शहरातील राजकीय घडामोडी आणि क्षणाक्षणाचे अपडेट्स नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात कोकणातील सर्वात मोठ्या सुपरफास्ट नेटवर्कने म्हणजेच ‘रत्नागिरी खबरदार’ (Ratnagiri Khabardar) ने बाजी मारली आहे. ‘रत्नागिरी खबरदार’च्या युट्युब चॅनलवरून प्रसारित करण्यात आलेले हे ‘महा कव्हरेज’ तब्बल १० हजारांहून अधिक दर्शकांनी पाहिले.

घरात बसून हजारो नागरिकांनी घेतला निवडणुकीचा अनुभव

रत्नागिरी शहरात मतदानाच्या दिवशी काय घडतंय? कोणाचं पारडं जड आहे? आणि मतदानाचा टक्का किती? हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता रत्नागिरीकरांना होती. मात्र, उन्हात बाहेर न पडता ‘रत्नागिरी खबरदार’ने हे सर्व अपडेट्स नागरिकांना घरबसल्या उपलब्ध करून दिले. युट्युब चॅनलच्या (YouTube Channel) माध्यमातून करण्यात आलेल्या या ‘लाइव्ह महा कव्हरेज’ मुळे नागरिकांना आपल्या मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर शहरातील १६ प्रभागांमधील इत्यंभूत माहिती मिळाली.

सलग ९ तास अखंडित प्रक्षेपण

रत्नागिरी खबरदारच्या टीमने या कव्हरेजसाठी विशेष मेहनत घेतली. सकाळी ९ वाजता सुरू झालेले हे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सायंकाळी ६ वाजेपर्यंत, म्हणजे सलग ९ तास सुरू होते. या कालावधीत अँकर्स आणि रिपोर्टर्सच्या टीमने मतदानाच्या सुरुवातीपासून ते ईव्हीएम मशीन सील होईपर्यंतच्या सर्व घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या.

१६ प्रभागांवर ‘रत्नागिरी खबरदार’ची नजर

रत्नागिरी नगरपालिकेच्या एकूण १६ प्रभागांमध्ये काय परिस्थिती आहे, कुठे रांगा लागल्या आहेत आणि कुठे चुरस आहे, याचे थेट वृत्तांकन या कव्हरेजमध्ये समाविष्ट होते. १० हजारांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळवत या कव्हरेजने रत्नागिरीत डिजिटल मीडियाच्या ताकदीची चुणूक दाखवून दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 03/Dec/2025