खेड : ५३ वे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन ४ व ५ डिसेंबर रोजी घरडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या या मुख्य विषयाला अनुसरून शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जल संवर्धन आणि व्यवस्थापन या उपविषयावर विज्ञान प्रतिकृती तयार करून या प्रदर्शनात मांडणार आहेत. खेड तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच विशेष शाळामधील विद्यार्थ्यांच्या जवळपास ३०० वैज्ञानिक प्रतिकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. याच बरोबर विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा यांचाही समावेश या कार्यक्रमामध्ये असणार आहे.
हे प्रदर्शन दरवर्षी राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरमार्फत तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आयोजित केले जाते. प्रथमतः शाळा/हायस्कूल स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरवून त्यातून निवड झालेल्या प्रतिकृती तालुका स्तरावर प्रदर्शित केल्या जातात. तालुका स्तरावर निवड झालेल्या प्रतिकृती जिल्हास्तरावर प्रदर्शनात मांडल्या जातात. या उपक्रमात घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग व बुक लॅण्ड डेपो चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रदर्शन व विक्रीची संधी खेड तालुक्यातील शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रदर्शनाचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 03/Dec/2025














