Mandangad : गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन

मंडणगड : लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘शाह-फुले-आंबेडकर’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन व भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त ‘भारताचे संविधान’ या विषयावर नुकतेच पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटक म्हणून संचालक आदेश मर्चडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी संचालक संतोष चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. हनुमंत सुतार, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. संगीता घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पोस्टर प्रदर्शनामध्ये शुभम मोरे, कल्याणी दिवेकर, राहिल राजबे, साक्षी मोरे, नेहा पवार, मीनाक्षी लोखंडे, अहना मुगरुस्कर, समिना जोगिलकर, सुहानी दूर्गवले, सलोनी जाधव, सिद्धी पंदीरकर, साक्षी तांबे, प्रियांका मर्चेंडे, सिमरन मुजावर, दिया रेवाळे, तन्वी शिगवण, जहाना शेख आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 03/Dec/2025