गुहागर : नगरपंचायत निवडणूकीसाठी मंगळवारी सकाळी 7.30 साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली दुपारी 1.30 वाजेपर्यंत 61.28 टक्के इतके मतदान झाले यामुळे अर्ध्या दिवसात याठिकाणी मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला मात्र हा मतदानाचा वेग दुपारनंतर काहीसा मंदावल्याचे दिसून आले. अखेर शेवटच्या टप्प्यात एकूण 75.26 टक्के इतके मतदान झाल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.
सकाळच्या सत्रात सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत याठिकाणी 23.37 टक्के मतदान झाले. यामध्ये 826 पुरुष मतदारांनी तर 567 स्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 1.30 वाजेपर्यंत याठिकाणी जवळपास 61.28 टक्के मतदान झाले होते. मात्र त्यानंतर पुढील 2 तासात मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र होते. दुपारी 3.30 वाजेपर्यंत या ठिकाणी एकूण 69. 12% इतके मतदान झाले.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत 2770 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1452 पुरुष मतदारांनी तर 1318 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 3653 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1868 पुरुष मतदारांनी तर 1785 सी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर दुपारी 1.30 ते 3.30 वाजेपर्यंत 69.12 टक्के इतके मतदान झाले. एकूण 2244 पुरुष तर 2242 सी असे एकूण 4486 इतके मतदान झाले. शेवटच्या टप्यात पुढील 2 तासात केवळ 8 टक्के मतदान झाले. तर त्यानंतर उर्वरीत मतदान शेवटच्या टप्प्यात झाले. यामध्ये शेवटच्या टप्प्यात केवळ 6 टक्के मतदान झाले. दरम्यान निकाल पुढे गेल्याने आता निकालाची उत्सुकता आणखी वाढणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 03/Dec/2025












