रत्नागिरी : ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. फोड़ा आणि झोड़ा या नीतीने राज्य केले. आजही परकीय शक्ती वाकड्या नजरेने पाहत असेल तर आपण देशाचा नागरिक म्हणून प्रतिकार करणे, एक आहोत हे दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे. भांडत राहिलो तर पुन्हा आक्रमण होऊ शकते, हे इतिहासातून शिकले पाहिजे. आपल्या राष्ट्राचा, संस्कृतीचा अभ्यास करा व अभिमान बाळगा, असे प्रतिपादन शनिवारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळातर्फे अतुल्य भारत प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यवाह सतीश शेवडे, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, कला विभागप्रमुख वैभव कानिटकर, विज्ञान विभागप्रमुख दिलीपकुमार शिंगाडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळ समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर उपस्थित होते.
इतिहास शोध आणि बोध
अतुलनीय भारताचे वैभव 6. विद्याथ्यर्थ्यांना समजावे, इतिहासाची आवड निर्माण व्हावी, ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी व पुढच्या पिढ्यांपर्यंत जावा या हेतूने अतुल्य भारत प्रश्नमंजूषा स्पर्धा प्रथमच आयोजित केली. त्यात शहर, परिसरातील १३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन उत्साह दाखवला. मंडळातील शिक्षक दत्तात्रय माळवदे, दिलीप जाधव, अन्वी कोळंबेकर, अपर्णा तगारे, आदेश मुकणे, योगेश जाधव, मधुरा चव्हाण, संयुक्ता शेट्ये आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यक्रम
स्पर्धेचा निकाल
थम क्रमांक- रा. भा. शिर्के प्रशाला अत्रेय देवस्थळी, श्रेया वाडकर, चैतन्य मुळ्ये, मार्गदर्शक राजेश आयरे, द्वितीय विभागून नवनिर्माण हाय-प्रसेनजित कांबळे, जयराज चौरी, भार्गवी पवार, मार्गदर्शक अलमास लांब आणि जीजीपीएस- आभा भाटवडेकर, आयुष ठाकूर, राधा खानोलकर, मार्गदर्शक सोनिया कांबळे, तृतीय फाटक हायस्कूल- रुद्र घडशी, तपस्या बोरकर, सिद्धी मोडक, मार्गदर्शक शिक्षक श्रेया रानभरे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:38 PM 04/Dec/2025












