Mandangad : मुद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

मंडणगड : शहरात दारुचे सेवन करुन मद्यधुंद स्थितीत मिळून आलेले मदन प्रसाद गोवर्धन हेम्ब्रम (५९, मुळचे राहणार झारखंड सध्या राहणार परिवार पार्क मंडणगड) व नारेन लोविन हेम्ब्रम (२८, मुळचे राहणार झारखंड सध्या राहणार परिवार पार्क मंडणगड) यांचे विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात १ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय पाटील यांनी १ डिसेंबर रोजी यासंदर्भात पोलीस स्थानकात दोघांचे विरोधात फिर्यादी नोंद केल्या आहेत. १ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून पाच मिनीटे व आठ वाजून त्रेपन्न मिनीटे यावेळी आरोपीत पोलीसांना मंडणगड शहरातील एका चौकात दारुचे सेवन करुन मद्यधुंदी स्थितीत आढळून आल्याने पोलीसांनी त्याचे विरोधात कारवाई करत गुन्हा नोंद केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 04/Dec/2025