Rabbi Hangam | जिल्ह्यात रब्बीच्या ५० टक्के पेरण्या पूर्ण

रत्नागिरी : डिसेंबर महिना उजडला तरी रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ऊस पीक वगळून २ हजार ६२७.६६ हेक्टर क्षेत्रावर तर ऊस पिकासह २ हजार ६४४.६६ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात एकूण सरासरी ५ हजार ४०५ हेक्टरवर पेरण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत पेरा ५० टक्क्यांवर गेला आहे. महिनाभरात उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कुळीथ, संकरित, पावटा, मका, कडधान्य, ऊस, कडधान्ययासह विविध पिकांची पेरणी झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्याला उशिर झाला. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने दमदार बॅटींग केल्यामुळे जिल्ह्यात भात पिके बहरली होती. पावसाळा हंगाम संपल्यानंतर ही ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी, अतिवृष्टी झाल्यामुळे भात पिके वाहून गेली, खराब झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक मातीमोल झाले. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर यंदा रब्बीची पेरणीला विलंब झाला.

काढणी, झोडणीला विलंब झाला. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खऱ्या अर्थान रब्बीच्या पेरण्यास सुरुवात झाली. कोकणातील शेतकऱ्यांनी नांगरणी करून कडधान्यासह पालेभाज्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे. आज तीन डिसेंबरपर्यंत आतापर्यंत २ हजार ६२७हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण असून सुद्धा पेरण्या संथ गतीनेच सुरू आहेत. डिसेंबरच्या महिनाभरात रब्बीच्या पेरण्या पूर्ण होतील, असेही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

अवकाळी पावसामुळे खरीप पिकांची

सर्वाधिक पेरणी राजापुरात…
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यास आता वेग आला आहे. जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सर्वाधिक ७२०, २५, रत्नागिरीत ५९३ हेक्टर, संगमेश्वरात ४२५ हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. तर सर्वांत कमी सर्वात कमी मंडणगडात ८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पाच हजार हुन अधिक रब्बी हंगामचे उद्दिष्ट आहे.

यंदा रब्बी हंगाम उशिराने सुरू झाला. त्यामुळे पेरण्याचा वेग कमी दिसतोय. यंदा ५ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल. – सदाशिव सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 04/Dec/2025