Accident : आंबा घाटात ट्रॅव्हल्स कोसळली दरीत

देवरूख : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील प्रसिद्ध आंबा घाटात आज शुक्रवारी पहाटे खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात काहीजण जखमी झाले असून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दरम्यान, अपघातानंतर देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासंदर्भात मदत केली.

ट्रॅव्हल्स क्र. MP 13 P1371 ही रत्नागिरीच्या दिशेने येत असताना आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ ही ट्रॅव्हल्स आली असता नियंत्रण सुटून 50 ते 70 फूट दरीत ही ट्रॅव्हल्स कोसळली. गाडीमध्ये 90 ते 120 च्या दरम्यान प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस व साखरपा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 05/Dec/2025