Datta Jayanti | चिपळुणात भक्तिमय वातावरणात दत्तजयंती उत्साहात साजरी

चिपळूण : चिपळूण येथील दत्तमंदिरात सकाळी दिगंबरा दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात भक्तिमय वातावरणात दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

दत्त जयंतीनिमित्त आज शहरातील विविध दत्त मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची आरास करण्यात आली होती. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक आणि खेडा येथील दत्त मंदिरात दत्तदर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व पूजा, सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रीवर पंचामृत अभिषेक झाला. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा करण्यात आली. जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजवला होता. भाविकांनी पाळण्यावर गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्तमंदिरात पारंपरिक पाळणागीते, आरती, प्रार्थना करण्यात आली. रात्री दहानंतर मंदिरात धूप, दीप, आरती व पालखी सोहळा झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 05/Dec/2025