पावस : तालुक्यातील मावळंगे-गजनेवाडी येथील लोखंडी विद्युत खांब गंजल्यामुळे परिसर धोकादायक बनला असून, त्यामुळे अनेक घरांचा विद्युतपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने विद्युतखांव बदलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
मावळंगे गावांमध्ये ज्या वेळेला प्रथम विद्युतपुरवठा करण्यात आला त्या वेळी गजनेवाडी परिसरामध्ये लोखंडी विद्युतखांब बसवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसेंदिवस विद्युतखांब सडला जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात पावस येथील कनिष्ठ अभियंता यांच्याकडे वारंवार लेखी निवेदनाद्वारे विद्युतखांब बदलण्याची मागणी करण्यात आली; परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होत आहे. खांब तुटून पडल्यास परिसरातील अनेक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो याकरिता विद्युतखांब बदलण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 05/Dec/2025












