BSNL : राजापूर-बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर सुरु

पाचल : मौजे बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुरू झाला आहे. आ. किरण सामंत, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी तालुक्यातील मोबाईल नेटवर्क तातडीने करावे, असे अधिकाऱ्यांना सांगितले. बालमित्र मंडळ अध्यक्ष कमलेश गांगण यांनी आमदार सामंत, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा केला. सरपंच नीलम हातणकर यांनी कागदपत्रे सुपूर्द केली.

यासाठी बीएसएनएल अधिकारी प्रशांत कुलकर्णी, रसाळ, शिरसाट, भू करमापक अधिकारी अदिती नार्वेकर, उपसरपंच शिवरामजी कामतेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष शेट्ये, सचिव विजय पांचाळ, दशरथ कामतेकर, सदस्य तनुजा बावकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय रोडे, योगेश हातणकर, संतोष कामतेकर, संभाजी कुळये, अनंत बावकर, राजेंद्र आगटे, महेश पांचाळ, मनोज पांचाळ, प्रमोद आगटे, मकरंद गांगण, वासुदेव चौगुले, अशोकशेट्ये, चंद्रकांत बावकर, अनंत कामतेकर यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 05/Dec/2025